लेख

                       

                                          नवनिर्मित भारत

     आयुष्याची आणि घरादाराची राखरांगोळी ज्या क्रांतिकारकांनी केली, त्याचं सर्वस्व उध्वस्त झाल, ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांची ही राखरांगोळी झाली त्याचा उपभोग त्यांना घेता येणार नाही हे त्यांना ठावूक होत. स्वातंत्र्य मिळवून त्यांच्या वाट्याला काहीच येणार नव्हत आणि जे स्वातंत्र्य आज आपल्या पदरात अगदी मोफत मिळालय त्याचा उपभोग आपण कसा घेत आहोत? ज्या मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली त्याच मातृभूमीची आज एवढी हेटाळणी होत असताना आम्ही आज गप्प बसलोय? खरच आजच्या पिढीला स्वातंत्र्याची ती किंमत जी क्रांतिकारकांनी दाखवली ती राहिलीय का? स्वातंत्र्यासाठी त्यांनी कुठला सौदा केला नव्हता, नसेलही पण मग त्यांच्या आयुष्याच्या सौद्याच काय? ते असाच वाया गेल अस समजायचं?

     आज स्वातंत्र्याच्या भ्रमात सर्वच जण आहेत. गोरा साहेब गेला आणि काळा साहेब आला, अगदी डोक्यावर बसलाय. गोरा साहेब अन्याय- अत्याचार करायचा, देशाला लुटायचा पण मग आज काळा साहेब काय करतोय? आपल्याच बांधवाना आपलाच काळा साहेब लुटतोय…. 

     राष्ट्र, देश, भारत, इंडिया….आपण कधी जवळून पाहिलाच नाही कसा दिसतोय ते. सतराशे साठ नको नको त्या जाती, पंथ, जातीची उतरंड, गोरगरीब उपाशी जनता, त्यांना ओरबाडणारे अतिश्रीमंत. आणि आपण फक्त वर्षातून दोनदा वल्गना करायच्या….पांढरे कपडे घालायचे, प्रभातफेऱ्या काढायच्या, वर्षभर मात्र देशप्रेमाचा दुष्काळ. 

     खरतर रक्तात भिनलेल्या गुलामगिरीची, अन्याय-अत्याचार सहन करण्याविरुद्ध क्रांती करावी लागेल तरच माझा भारत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र  होईल.

     देश म्हणजे फक्त घरे, गाड्या, झाडे, फुले, डोंगर नाहीत. देश फक्त नकाशावर नसतो. देश मनामनात असतो आणि तो सर्वांच्या मनात आहे. ही मने एक होतील, उसळून येतील. भले वेळ लागेल पण उसळी मारणाऱ्या असंख्य मनांचा देश नव्याने उभा राहील आणि तो नवनिर्मित भारत असेल अगदी तसाच ज्यासाठी असंख्य वीरांनी बलिदान दिले. मजबूत इमारतीच्या पायाभरणीत भक्कम कसदार माती लागते जी क्रांतिकारकांच्या आहुतीने झाली आता त्यावर मजबूत इमारत आपल्याला बांधायची आहे. 

     भारत माता की जय !   


                                     देव देव्हाऱ्यात नाही


देव ह्या विषयावर काही बोलायचं अथवा लिहायचं म्हटल्यावर वादाचा मुद्दा त्यामुळे प्रसिद्ध असलेल्या गाण्याच्या आधारे लिहिण्याचा हा प्रयत्न. सर्व धर्म समान आहेत अस ज्या देशात बोलल जात त्याच देशात आज धर्माच्या नावाने जो सुलसुलाट चालू आहे तो पाहून मन सुन्न होवून जात आणि वाटत काय चाललय हे? आपण मंदिरात जातो पण मंदिर म्हणजे काय हे किती जणांना माहित आहे, मंदिरात जावून काय आणि कुठल्या पद्धतीने करायचं ते माहित नाही… कारण आपल्याला कधी ह्या गोष्टी शिकवल्याच नाही. मंदिर म्हणजे पवित्र जागा ज्या ठिकाणी माणसे एकत्र येवून भक्तीभावाने देवाचे नामस्मरण करू शकतील. पण आज मंदिरांची (विशेष दान पेट्यांची) काय अवस्था आहे ते तुम्ही आम्ही जाणताच. सर्वच मंदिरे तशी आहेत अस मी म्हणत नाही. माझ अस स्पष्ट म्हणन आहे की आज आता ह्या घडीला जर प्रत्येकाने आई-वडिलांची मनोभावे सेवा करायची ठरवली तर मंदिरातल्या देवाची गरजच राहणार नाही. आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ दैवत दुसरे नाही अस उगीच म्हटलं नाही.  देव पाहण्यास गेलो पंढरपुरास, मला नाही ठाव विठोबा घरात…. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------



                   निर्णय आयुष्याचा


    निर्णय चुकतात आयुष्यातले पण त्या निर्णयांना प्रश्न बनवून गुंता अजून वाढवायचा की त्या प्रश्नांची उत्तरे शोधून आयुष्य अजून सुंदर बनवायचं? अस म्हणतात  की ज्याच्या हातून चुका होत नाहीत तो माणूस कसला ? पण मग काय चुका करतच राहायचं ? तर नाही………. चुका करून त्या सुधारतो, त्यातून पुन्हा अशा चुका करणार नाही अस शिकतो तो खरा माणूस.
    जगतो तर प्रत्येक जण. कुणी त्याच्यासाठी, कुणी तिच्यासाठी, कुणी घरातल्यांसाठी, कुणी मुलांसाठी तर कुणी स्वतःसाठी. पण जगत असताना जबादारीने जगणे, सामाजिक जाणिवेचे भान ठेवून जगणे खूप महत्वाच. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना इकडून तिकडून वाहणारे वारे आपल्याला आपला पत्ता विसरायला लावतात. जिकडे पावले पडायला पाहिजेत्तीकडे न पडता मार्ग चुकतात. माणूस पडतो, धडपडतो पण त्याचवेळी सुधारणे, त्याचवेळी खंबीरपणे उभे राहणे खूप गरजेचे.    आयुष्याच्या ह्या धकाधकीत स्वतःची काळजी घेणे तसेच आपल्या कुटुंबाला सांभाळणे महत्वाचे. कोणत्याही संकटाला ठामपणे उभे राहून सामोरे जाणे, ती संकटे सोडविणे ह्यातच खरा पुरुषार्थ आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

                 आज तिच लग्न आहे......

जिच्यावर मनापासून खूप प्रेम केलय, तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, खूप सारे दिवस-वर्षे जिच्यासोबत व्यतीत केले, तू फक्त माझीच अशा आणाभाका घेतल्या अशा प्रिय व्यक्तीच लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी होत आहे असा दिवस आयुष्यात येण म्हणजे एक वेगळाच अनुभव, एक वेगळीच भावना.... तो दिवस आज माझ्या आयुष्यात आलाय.
माझ्या खूप मित्रांसोबत असच झाल होत. त्यांच्या प्रिय व्यक्तीच लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी होणार होत, नेमक्या त्याच दिवशी गम मै कुछ पिते है अस म्हणून त्यांना साथ देखील दिली. तेव्हा त्या मित्राच्या नेमक्या भावना कळाल्या नाहीत. नाही भेटली तर नाही भेटली, एवढ काय त्यात अस त्यावेळी म्हणायला काही वाटल नाही पण आज तिच वेळ माझ्यावर आलीय.
खरतर काही सुचत नाहीय. मनाला दरवेळी, प्रत्येक क्षणाला सांगतोय की त्या विषयाकडे लक्ष देवू नकोस तुलाच त्रास होतोय पण मन सारख तिकडेच धावतंय. ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीय तिकडेच सारख लक्ष जातंय. मनाची आणि माझी अवस्था काय झालीय माझ मलाच माहित.

शेवटी काय.......सर्व जिवलग मित्रांना फोन करून बोलावलंय.... प्रत्येक प्याल्याबरोबर पिसासारखे हलके करणाऱ्या काचेच्या जादुई मंत्राने भरलेल्या बाटल्या घेवून तपाला बसायला......  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------
                    --------- आनंद -: प्रेम धर्म ----------

     आज प्रत्येक जण धावतोय, पळतोय… त्याला मान सन्मान, प्रसिद्धी, नाती आणि सर्वात महत्वाच पैसा हवाय. अतिलोभाने हव्यासापोटी पैशाच्या मागे धावणारा कडी मान्यच करणार नाही की मी पैशाच्या मागे धावतोय. 
     आज प्रत्येकाला सुख, आनंद हवाय परंतु त्याला नेमक काय हवय सुख की आनंद हेच त्याला कळत नाही. सुख आणि आनंद खरतर खूप भिन्न आहेत हेच अजूनपर्यंत आम्हाला समजल नाही. सुखाचा आणि आनंदाचा नेमका अर्थ काय तेच कळाल नाही अजून आम्हाला……… 
     सुखाला विरुद्धार्थी शब्द दु:ख आहे म्हणजेच जेथे सुख आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला दु:ख असतच असत परंतु आनंद ह्या  गोष्टीला विरुद्धार्थी काहीच नाही. आनंद अगदी शुध्द आहे, निर्मल आहे. आपण जीवनाकडे कसे पाहतोय त्यातूनच खरा आनंद मिळतो. जगाकडे सकारात्मक पहा, जग नक्की तुम्हाला तसच कितीतरी पटींनी चांगल देईल. 

     खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे…….  





                   ----------हटके कुटुंब-----------


         आई-बाबा ,भाऊ बहिण ह्या विषयावर खूप जणांनी खूप काही लिहिलंय , मी काय वेगळ लिहिणार …. शब्दांच्या पलीकडे मनाच्या,प्रेमाच्या साच्यातून व्यक्त होणारी ही नाती .
                    तुम्ही आईकडे कधी अर्धी भाकरी मागा , ती दोन तुकडे करेल आणि जो मोठा तुकडा असेल तो आपल्याला देईल,  दुसरा लहान तुकडा तिच्याकडेच ठेवील . शाळेत , खेळात अन्य कुठ्ल्याही स्पर्धेत अव्वल या , कोणतेतरी चांगले काम करून बाबांना सांगा , त्यांच्याकडे १०० रु . मागा …. १०० चे हजार देतील ते बाबा . त्या १०० रु. मधील ५० रुपयांवर हक़्क़ सांगतो तो भाऊ . उरलेल्या ५० रुपयांमधून कमीतकमी ५० रु. चॉकलेट  तरी स्वत:हून आणून द्यावस वाटत ती बहिण .

                   असच असत प्रत्येकच हटके कुटुंब …….  !


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
                                              -------- कुठे चाललोय आपण ?-----------
         
 नुकताच एके ठिकाणी जाण्याचा योग आला . शाळेतील वार्षिक पुरस्कार वितरण आणि  सांस्कृतिक कार्यक्रम होता . शिवाजी महाराजांवर आधारित " गड आला, पण सिंह गेला " हे नाटक . अत्यंत  उत्तम . त्यापुढील गाण्यात मात्र दुसरीकडेच भरकटलो आणि विचार करू लागलो .
                   पुढील गाण्याचे बोल होते ….  "एक बुंद मुझे भी पिला दे शराबी देख फिर होता है क्या ?…. " आणि ह्या गाण्यावर सातवी इयत्तेतील एक मुलगी अत्यंत कमी कपड्यात नाचत होती . काही समजायच्या उमजायच्या पेक्षा कमी वयात ती मुलगी नाचत होती ? शिवाजी महाराजांवर आधारित नाटकाला जेवढे बक्षीस रुपी पैसे मिळाले नाहीत त्यापेक्षा जास्त ह्या गाण्याने त्या मुलीला मिळवून दिले .
                       कुठे चाललाय समाज आपला ?
                    ज्या शिवाजी महाराजांना एका नर्तकीचे नाच बघितले म्हणून मां जीजाऊंनी " आम्ही तुमच्यासमोर असेच नाचलो तर बघू शकाल का ?" असे खडे बोल सुनावले त्याच महाराजांच्या भूमीत आम्ही ह्या विकृतीला पोहचाव ?

                       बर त्या मुलीला शरीराचा कोणता भाग का हलवावा हे माहित नाही तर निदान तिच्या  पालकांनी तरी ह्या गोष्टीच भान ठेवायला हव . तेही नसेल तरी कमीतकमी बघ्यांनी तरी ह्याची जाणीव ठेवायला हवी .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------


                                               ------- दारूचा प्याला ------------

     नक्की अस आठवत नाही पण १८ वर्षे पूर्ण झाली आणि मज्जा म्हणून आज बिअर प्यायची ठरवली होती. नाही- नाही बहुतेक ३१st ची पार्टी होती, बहुतेक graduation चा निकाल लागला होता त्यानंतरची पार्टी असावी. ठरल्याप्रमाणे प्रत्येक मित्राने हातात ग्लास घेतला आणि पार्टी झाली.
मग काय प्रत्येक वेळी पिण्यासाठी कारणे येताच राहिली. मित्राच्या वाढदिवसाला प्यायचीच नाहीतर त्याला कस वाटेल ह्या विचारात आमच्या ३०-४० मित्रांच्या प्रत्येक वाढदिवसाला काचेचे जादूने भरलेले ग्लास आणि त्यांचे चिअर्स चे आवाज ऐकू यायला लागले. त्यात भरीस भर म्हणून ब्रेकअप पार्ट्या रंगू लागल्या, प्रत्येकाचे कमीत कमी दोन ब्रेक अप ठरलेले आणि तिच्या लग्नाच्या दिवशी प्रत्येकाने एक दोन बाटल्या जास्त प्यायच्या, स्वतःच्या प्रेयसीच लग्न झाल म्हणून त्या मित्राला साथ म्हणून मी खूप प्यायचो.थंड बिअर मागणारे आम्ही चिल्ड बिअर पिवू लागलो.
     दिवस सरता सरता वर्षे पालटून गेली. हातातला ग्लास मात्र वेगवेगळ्या निमित्ताने हातातच राहिला. जसे पेट्रोल- डिझेलचे भाव तसे आमच्या लाडक्या बिअरचे देखील भाव वाढले. ४५ रुपयापासून प्यायला सुरु केलेली बिअर १३० च्या पुढे गेली मग काय लोकांनी जसा सीएंनजी कडे मोर्चा वळवला तसा आम्ही देखील स्वस्त पर्याय म्हणून व्हिस्की, रम, वोडका असे अनेक पर्याय वापरू लागलो. करणे भरपूर होती. आज मी टेन्शन मध्ये दुसर्या दिवशी मित्र टेन्शन मध्ये, परत ठरल्या प्रमाणे मित्राचा वाढदिवस, कितीही लांबचा असला तरीही जवळच्या मित्राची हळद आणि दुसर्या दिवशी लग्नाची वरात, आजकाल आम्ही मित्राच्या घरातील सर्व मंडळींचे वाढदिवस देखील साजरे करू लागलोय. त्या निमित्ताने काचेचे आवाज काढू लागलोय.
     गटारी साजरी करायची म्हणजे जणू काही आज आमच्या पैकी प्रत्येकाचा वाढदिवस आहे अस समजून सगळे जण अगदी जोमाने कामाला लागत. प्रत्येकाचा ब्रान्ड, ग्लास, सोडा, चखणा,तळलेली मुगाची दाल वगैरे वगैरे येत गेले. पुढे असे भरपूर दिवस येत गेले. शाळेत अर्धा बेंच तुझा, अर्धा बेंच माझा म्हणून मध्ये रेष मारून तू आता इकडे यायचं नाही अशी प्रेमळ भांडणे करणारे आम्ही आज तो मला असा बोलूच कसा शकला, मी असतो तर ऐकून घेतलं नसत अस म्हणून नशेतच भांडू लागलो, मारामारी- राडे कधी सुरु झाले कळालच नाही .
     बिअर पिवून मज्जा करायची अस ठरवलं होत आणि आज झोप येत नाही, राडे करायचे आहेत, टेन्शन आहे म्हणून गावठी दारूचे फुगे आणि संत्र्याची चपटी पाण्यात टाकून पीत आहोत. आज वय ४७ झाल. मुलगा २० वर्षाचा झाला. तो देखील बाबा बस झाली दारू आता अस सांगून सांगून थकला. बायको माझ्यासोबत बोलत नाही कारण दृ पिवून तिच्या च्रीत्र्यावर घेतलेला संशाल आणि तिला केलेली मारझोड विसरायला ती तयार नाही. मनात काहूर माजलय .
     आज पुन्हा गटारी आलीय…………………………… काय करू मी ???
--- सुरज भगत.


------------------------------------------------------------------------------------------------------------------
                              ---------------   नापास ----------------
     आतापर्यंत महाराष्ट्रात अथवा देशात दहावी- बारावीत पहिल्या दहा क्रमांकात आलेल्या विद्यार्थ्यांनी ह्या महाराष्ट्राला वा भारत देशाला काय दिलेआपल्याला प्रत्येक जण सांगतो...अभ्यास कर.... अभ्यास कर...पण नक्की किती अभ्यास करणारे पुढे गेलेतत्यांनी नोकऱ्या करून भरपूर पैसे कमावले असतील. परदेशात राहून एकदम हाय-फाय राहत असतील पण त्याने इतरांना काय फायदा झालाह्या देशाला त्यांचा काय उपयोग?
इथून वेगवेगळ्या स्कॉलरशिप घ्यायच्या आणि परदेशात जावून त्या देशाची सेवा करायची? काय साधणार ह्यातून?
     ह्या उलट तुम्हाला भरपूर उदाहरणे सापडतील... दहावी बारावी नापास झालेले, ज्यांना गावाबाहेर हाकलून दिले, ज्यांना विहिरीवर पाणी भरू दिले नाही, ज्यांना वाळीत टाकले, जे खरच शाळेत जावून काहीच शिकले नाही, अशा कितीतरी जननी उद्योगभरारी घेवून, नवीन काहीतरी करून आणि सर्वात महत्वाच म्हणजे ह्याच देशात राहून खूप काही साध्य केलय. भरपूर अभ्यास करून प्रथम आलेल्या कितीतरी जणांना ह्यांनी(ज्यांना गावात महाभाग म्हटले जायचे) नोकऱ्या मिळवून दिल्यात. 
कोणीतरी म्हटलं आहे की, आयुष्यात पुढे जायचं असेल, भरपूर पैसा कमवायचा असेल तर पहिल्यांदा शाळा सोडा आणि खरच अशा शाळा सोडलेल्या. खूप कमी शिकलेल्या कित्येकांनी खूप नाव व पैसा कमावलेला तुम्हाला माहित असेल. 
     दहावी- बारावीत नापास होणार असाल तर त्या अपयशाने न घाबरता पुढील यशस्वी वाटचालीसाठी तयार व्हा कारण तुम्हाला नोकरी मिळवायची नाही....दुसऱ्यांना नोकऱ्या द्यायच्या आहेत.
     ह्या चर्चा देखील तशाच. दोन दिवस चर्चा चालणार. त्यानंतर काही नवीन मसाला तयार होतोच आपोआप, त्यावर चर्चा घडवायच्या. त्या संपल्या की नवी काहीतरी आहेच तयार. काहीच नाही सापडलं तर ब्रेकिंग न्युज च्या नावाखाली भरपूर काही अगोदरच तयार करून ठेवलाय ते ओतायचं.
आई बापाला वेगळी चूल देवून, कधी जेवलात का? कसे आहात ह्याची जराही विचारपूस न करणारा मुलगा त्यांच्या मृत्युनंतर त्यांची पुण्यतिथी थाटामाटात करत असेल, शे-दोनशे लोकांना जेवायला देत असेल तर ते कितपत योग्य आहे?
    आपलं आपनाच्थारावायला हव की आई वडील नातेवाईक जिवंत असताना त्यांना किंमत द्यायची की ते ह्या जगातून निघून गेल्यावर.
------------------------------------------------------------------------------------------------------------

                                ----------------- स्वप्नांची पतंगे-------------- 

     आपल्याला जे हवय अथवा जे साध्य करायचं आहे अशा स्वप्नांची पतंगे खरोखरच आकाशात उडवायची असतील तर पहिल्यांदा घराबाहेर पडल पाहिजे. आपल्याला आपण सध्या जसे आहोत ते बदलायचं असेल तर आपण सध्या जसे विचार करतोय ते बदललं पाहिजे. आपल्या डोक्यात खूप कल्पना असतील, खूप काही करावस वाटत असेल, आयुष्यात खूप मान- मरातब मिळवायचा असेल तर हे सर्व घरात राहून शक्य नाही, त्यासाठी घराचा दरवाजा सोडला पाहीजे. नुसत घराबाहेर पडून देखील जमणार नाही आपण बाहेर पडू त्याच बरोबर आपले विचार देखील बाहेर पडले पाहिजे.

     मनुष्यसंपत्तीने भरलेल्या जगात जेव्हा तुम्ही पाऊल ठेवाल, तेव्हा मनाची सर्व दारे उघडी ठेवून जे काही शिकता येईल ते आत्मसात करून, जगाची रितभात शिकून ते जेव्हा अंमलात आणू तेव्हा आपल्या स्वप्नांची पूर्तता खूप दूर नसेल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------

                                      --------------तूची खरा देव!----------------

     लहान मुलात हा अजब गजब माणूस कोण खेळतोय पाहायला गेलो तर डोक्यावर मुसलमानी टोपी, गळ्यात रुद्राक्ष आणि तुळशीमाळा.
मी - तुमच नाव काय ?
उतार वयाकडे झुकलेला तरीही अगदी ताजातवाना, अगदी २५-३० वर्षाच्या तरुणाला लाजवेल एवढा उत्साह. हसत मुख त्याने उत्तर दिले.
तो- सर्व जन मला फर्नांडीस काका म्हणतात.
त्यांचा असा अवतार पाहून तुमचा धर्म कोणता अस विचारावस वाटल पण विचारू शकलो नाही.
मी- काय मग काका आषाढी वारीला जाणार आहात की रोजा चालू आहे?
तो - दोन्हीपैकी काही नाही. एक महिनाभर चालत जायचं, उपवास करायचं ते माझ्या मनाला पटत नाही.
मी - मग काय पटत?
तो - ह्या महिन्यात मी दरदिवशी ५० अशी १५०० झाडे लावणार आहे, त्यातील १००० जरी जगली तरी माझी वार सफल झाली अस समजेन.
मी काही बोलणार तेवढ्यात लहान मुलांमधून हाक आली, " फर्नांडीस काका तुमची batting आली, या खेळायला."
----------------------------------------------------------------------------------------------------------------

                                  -------- मी पाहिलेला देव---------

घरी जात असताना अचानक एक फोन आला.
तो- सुरज भगत? Success Foundation?


मी - होआपण कोण?

तो- आदिवासी मुलांसाठी तुम्ही चालवत असलेल्या शिक्षण विकास कार्यक्रमासाठी मला तुम्हाला मदत करायची आहे. तुम्ही आता कुठे आहात?

मी- गव्हाणफाटा. 

तो- तिथेच थांबामी दोन मिनिटात आलो.

मी त्या अनोळखी इसमाची दोन मिनिटे वाट पाहत तिथेच थांबलो आणि तो खरच आला. माझ्या हातात एक पाकीट दिल, आत काय होत माहित नाही. जसा तो आला तसा निघूनही गेला. मला खूप काम आहे अस काही तो पुटपुटला.
पाकिटात काय आहे ते जाणून घ्यायची उत्सुकता होतीच पण त्याहीपेक्षा तो नक्की कोण होता हे विचार करताना भूतकाळात गेलो आणि सर्व काही आठवल. पुण्यात शिकत असताना अगदी रुपयापासून पैशाचा हिशेब ठेवणारा, चहा पिणार तो पण कटिंग असा तो माझाच मित्र, खूप बदललेला, डोळ्यात पाहताच खूप काही सांगून जाणारा, चेहऱ्यावर एक वेगळीच उर्जा असलेला तो मित्र आला, भेटला, संस्थेला मदत केली आणि निघूनही गेला. कुठे गेला माहित नाही.
हातातलं पाकिट उघडून पाहिलं. ५०० रुपयांच्या २० नोटा. तब्बल १०००० रुपये तो माझ्या हातात ठेवून गेला. त्याचबरोबर माझ्यावर त्याने ठेवलेला विश्वास आणि त्याने दिलेली मदत तोग्य हातात पोहचण्यासाठी माझ्यावर आलेली जबाबदारीची जाणीव झाली.
एका हाताने दान केलेलं दुसऱ्या हाताला कळू नये म्हणून माझ नाव कुठेही काढू नकोस अस मात्र आठवणीने सांगून गेला.
ह्या जगात देव, अल्ला, येशु, मालिक कुठे आहे माहित नाही पण मी पाहिलेल्या त्या देवाने मला उल्हासित केले. त्याने सामाजासाठी काहीतरी चांगल करत असताना अजून करत रहाव ह्यासाठी आशीर्वाद दिले. त्याचे हे आशीर्वाद सार्थक करण्याचा मी मनोभावे प्रयत्न करेन.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

                          -------------  जिवंत देव-----------------
    अरुणा शानभाग ह्यांच्या मृत्युनंतर एक गोष्ट मनाला ठेच लावून गेली. त्या जिवंत असताना इच्छामरणावर कधीही झाली नसेल एवढी चर्चा एका दिवसात झाली.खरतर माणूस जिवंत असताना त्याला काडीचीही किंमत द्यायची नाही आणि मेल्यानंतर काव काव करून कावळ्यांना जेवायला बोलवायचं, असा हा प्रकार झाला. दयनीय यातना सहन करत गेली ४२ वर्षे ज्यांनी एकाच अंथरुणात एवढा मोठा कालावधी घालवला त्या ४२ वर्षात इच्छामरण, दयामरण ह्या गोष्टींवर चर्चा घडायला हव्या होत्या आणि निष्कर्ष देखील निघायला हवे होते पण त्या चर्चा आज त्यांच्या मृत्युनंतर घडतात, किती हा विरोधाभास!


No comments:

Post a Comment